अहमदनगर मधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत ११ जणांचा मृत्यू झाले आहेत. तर या आगीत मृत्यूमुखी पडललेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट करत नगर दुर्घटनेप्रकरणी सहवेदना व्यक्त केली. तसेच ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राजेश टोपे यांनी ट्विट केले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. — Rajesh Tope (@rajeshtope11) November 6, 2021
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.