पाणी कपातीविरोधात रहिवासी आक्रमक

जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणी कपात आणि अनियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात डोंबिवली एआयडीसी रहिवासी भागातील नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेल्या आठवड्यात एमआयडीसीतर्फे देखभाल दुरुस्ती कामानिमित्त २४ तासांची पाणी कपात कऱण्यात आली होती. मात्र जाहीर केलेल्या २४ तासांपेक्षा दुप्पट वेळ उलटूनही हा पाणी पुरवठा सुरू न […]

पाणी कपातीविरोधात रहिवासी आक्रमक

जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणी कपात आणि अनियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात डोंबिवली एआयडीसी रहिवासी भागातील नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेल्या आठवड्यात एमआयडीसीतर्फे देखभाल दुरुस्ती कामानिमित्त २४ तासांची पाणी कपात कऱण्यात आली होती. मात्र जाहीर केलेल्या २४ तासांपेक्षा दुप्पट वेळ उलटूनही हा पाणी पुरवठा सुरू न झाल्याने निवासी विभागातील नागरिक संतप्त झाले होते.

अखेर सोमवारी या सर्व नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपला रोष व्यक्त केला. तसेच पाणी कपात करण्याऱ्या वेळेनंतरही पाणी पुरवठा का झाला नाही ? याबाबत नागरिकांना माहिती का कळवली नाही असा संतप्त सवाल केला आहे. तर येत्या काळात निवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही, तर भविष्यात नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, ज्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ती सर्व कामे पाणी कपातीच्या वेळेत पूर्ण झाली. मात्र पाणी पुरवठा सुरू करण्याच्या वेळेस अंबरनाथ येथे एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता विजय शांताराम धामापूरकर यांनी नागरिकांना दिली. तसेच निवासी भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय सुरू असून येत्या वर्षभरात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वासही धामापूरकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number