Mumbai AC Local: सीएसएमटी-कल्याण प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ

प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या ताफ्यात आणखी एक नवीन वातानुकूलित (AC) लोकल समाविष्ट करत आहे.

Mumbai AC Local: सीएसएमटी-कल्याण प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्यांमध्ये होणार वाढ

Mumbai AC Local: मुंबईत उन्हाचा पारा वाढत असतानाच मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या ताफ्यात आणखी एक नवीन वातानुकूलित (AC) लोकल समाविष्ट करत आहे. या नवीन गाडीमुळे मध्य रेल्वेवरील एसी फेऱ्यांची एकूण संख्या आता 100 च्या पार जाणार आहे. सध्या मध्य रेल्वेवर दिवसाला 94 फेऱ्या होतात, मात्र नवीन लोकल दाखल झाल्यानंतर मुख्य मार्गावर दररोज 12 ते 14 अतिरिक्त फेऱ्या धावतील. चेन्नईच्या 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'कडून (ICF) ही गाडी एप्रिल अखेरपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे प्रवाशांची गर्दीतून काही प्रमाणात सुटका होणार आहे.

कल्याण ते CSMT प्रवाशांना फायदा
रेल्वे प्रशासनाच्या नियोजनानुसार, या नवीन फेऱ्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण दरम्यान चालवण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे एसी लोकलच्या तिकिटांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर फेऱ्यांचे शतक पूर्ण होत असले, तरी पश्चिम रेल्वे या शर्यतीत अजूनही आघाडीवर आहे; कारण पश्चिम रेल्वेवर सध्या 133 एसी लोकल फेऱ्या धावत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद पाहता, रेल्वे आपल्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने आणखी गाड्या वाढवण्यावर भर देत आहे.

केवळ फेऱ्या नको, शिस्तही हवी
रेल्वेने फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी नियमित प्रवाशांनी काही महत्त्वाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या एसी लोकल अनेकदा उशिराने धावत असल्याने नवीन फेऱ्या सुरू करताना वेळेचे काटेकोर नियोजन असावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, तांत्रिक कारणास्तव एखादी फेरी रद्द झाल्यास स्थानकांवर तातडीने उद्घोषणा करणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रवाशांचा वेळ आणि पैसे वाया जाणार नाहीत. रेल्वेने केवळ सुविधा न वाढवता त्यातील नियमितता राखण्यावर भर द्यावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Mumbai Water Tax Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार; पाणीपट्टीत 8 टक्के वाढीचा प्रस्ताव; कधीपासून लागू होणार दरवाढ? जाणून घ्या

विनातिकीट प्रवाशांवर वचक ठेवण्याचे आव्हान
उन्हाळ्यामुळे एसी लोकलमध्ये होणारी गर्दी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. अनेक प्रवासी विनातिकीट किंवा साध्या लोकलचे तिकीट असतानाही एसी डब्यातून प्रवास करत असल्याने अधिकृत तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेतही तिकीट तपासणी मोहीम कडक करण्याची आणि विनातिकीट प्रवाशांवर वचक निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रवासाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा आणि शिस्तीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number