राज्यात बुधवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची अंदाज हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात पुढच्या ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुसळधार पावसामुळे राज्यभरात ठिकठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
संपूर्ण राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर अनेक ठिकाणी पूरस्थितीही उद्भवली आहे. मुंबईसह उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच, शहरात सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे.राज्यात अनेक भागात पाणी साचले आहे तर काही ठिकाणी पूर परिस्थती निर्माण झाली आहे अनेक नागरिकांना पाण्यातून वाट काढत कामाच्या ठिकाणी पोहचावे लागत आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा,
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर
यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद,
जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली