देशात आज हनुमान जयंतीचा उत्साह दिसत आहे. अशातच ठाण्यातही ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात मनसैनिक हनुमान चालीसा पठणासाठी एकत्र आले आहेत.

औरंगाबादमध्ये मनसेकडून औरंगाबादमधील दक्षिकमुखी हनुमान मंदिरासमोर हनुमान चाळीसाचे पठण करण्यात आला. पोलिसांनी मनसे कार्यकत्यांना नोटीस दिल्याने मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यातही हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यअक्ष शरद पवार जालन्यातील एका कार्यक्रमासाटी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांकडून पवारांच्या मुक्कामस्थानी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच जालन्यातील आयोजित कार्यक्रमाच्या स्थळीसुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.