IPL 2026 RR vs CSK : ज्या टीमला चॅम्पियन केलं, तिला डोळ्यासमोर हरताना पाहून जडेजा भावूक, VIDEO Viral

गेली 13 वर्षे ज्या टीमसाठी तो जीवाच्या आकांताने खेळला आणि पाच वेळा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपले योगदान दिले अशा टीमला हरताना पाहून जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2026 RR vs CSK : ज्या टीमला चॅम्पियन केलं, तिला डोळ्यासमोर हरताना पाहून जडेजा भावूक, VIDEO Viral

नुकताच राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलच्या 19 व्या हंगामातील तिसरा सामना रंगला. या सामन्यावर राजस्थानने एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम निराशाजनक पाहायला मिळाली असून सामन्यादरम्यान सर्वात मोठी चर्चा झाली ती म्हणजे रवींद्र जडेजाची. गेली 13 वर्षे ज्या टीमसाठी तो जीवाच्या आकांताने खेळला आणि पाच वेळा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपले योगदान दिले अशा टीमला हरताना पाहून जडेजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा- IPL 2026 RR vs CSK : RCB, MI नंतर राजस्थानची घरच्या मैदानावर विजयी सुरुवात; 'धोनी'विना चेन्नईचा लाजिरवाणा पराभव

कारण तो यावेळी चेन्नईसाठी नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरला होता. जडेज 2012 ते 2025 या दोन प्रमुख कार्यकाळांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ होता. चेन्नईसोबत अनेक वर्षे घालवल्यामुळे, जडेजाचे चेन्नई सुपर किंग्स आणि त्या संघाच्या चाहत्यांशी एक घट्ट नाते आहे. दरम्यान कालच्या सामन्यात तो त्याच चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात उभा होता. सामन्यादरम्यान, सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना जडेजा भावूक झालेला व्हिडिओ झटपट व्हायरल झाला. 
आयपीएल 2026 च्या लिलावात राजस्थानने त्याला 14 कोटींमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधात खेळताना दिसला. रवींद्र जडेजाने 2012 पासून CSK साठी 150 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या, त्याने 2300 हून अधिक धावा केल्या. तसेच चेन्नई सुपर किंग्सला 2018, 2021 आणि 2023 मधील विजेतेपद मिळवून देण्यात जडेजाचा सिंहाचा वाटा होता.

हेही वाचा- Shahrukh Khan : 14 वर्षांचा तो वनवास, आजतागायत शाहरुख खाननं ठेवलं नाही वानखेडेवर पाऊल…, ती घटना जिव्हारी लागली?

2023 ला अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करत सामना जिंकवला होता, पहिल्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले. आज मात्र तोच जडेजा चेन्नईसमोर उभा राहिला आणि आपल्या नव्या पण जुन्याच संघासाठी मॅच-विनिंग कामगिरी करत पुन्हा एकदा आपली महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number