#PulwamaTerroristAttack: नालासोपाऱ्यात प्रवाशांचा रेल रोको, वाहतूक ठप्प

जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज सकाळपासूनच रेल रोको केला आहे. नागरिकांच्या […]

#PulwamaTerroristAttack: नालासोपाऱ्यात प्रवाशांचा रेल रोको, वाहतूक ठप्प

जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे.

या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज सकाळपासूनच रेल रोको केला आहे.

नागरिकांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

आज सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो प्रवासी उत्स्फूर्तपणे रेल्वे मार्गावर उतरले आणि त्यांनी रेल्वेची वाहतूक रोखून धरली.

दरम्यान, तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले असून 20 जखमी झाले आहेत.

गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number