कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांची ‘ही’ मागणी

गेल्या काही दिवसांपूर्वी 12 हजार रुपयांवर पोहचलेल्या कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. गेल्या तीन चार दिवसांपासून कांद्याला 4 ते साडे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आयात थांबवण्याची मागणी करत आहेत. परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आवक घटली […]

कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांची ‘ही’ मागणी

गेल्या काही दिवसांपूर्वी 12 हजार रुपयांवर पोहचलेल्या कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालीय. गेल्या तीन चार दिवसांपासून कांद्याला 4 ते साडे 4 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आयात थांबवण्याची मागणी करत आहेत.

परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आवक घटली आणि कांद्याच्या दरात वाढ झाली होती.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षानंतर कांद्याचे दर तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.

मात्र, आता आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरत असल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे देशांतर्गत कांद्याचे आवक वाढल्याने केंद्र सरकारने कांदा आयात करू नये अशी मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांद्याचा दरात मोठ्या प्रमाणात घसरण होतेय. त्यामुळे कांदा आयताचा निर्णय रद्द करून कांदा निर्यात करावी अशी मागणी देखील होत आहे.

जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड,पिंपळगाव, उमराने या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढत असल्यानं दर देखील घसरत आहेत.

बारा हजार रुपयांपर्यंत गेलेलं कांद्याचे दर थेट चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यानी सरकारनं कांदा आयात करू नये अशी मागणी केलीय.

तर दुसरीकडे देशांतर्गत देखील कांदा आवक वाढत आहे त्यामुळं आयात सुरूच राहिली तर येणाऱ्या काळात कांद्याचे दर अजून घसरू शकतात अशी भीती कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीय.

कांद्याचे दर घसरल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number