राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक निमंत्रित उपस्थित होते. राजभवनातील दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवर बांधण्यात आला असून या नवीन दरबार हॉली […]

राजभवनातील नव्या दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक निमंत्रित उपस्थित होते.

राजभवनातील दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवर बांधण्यात आला असून या नवीन दरबार हॉली आसन क्षमता ७५० इतकी आहे. नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही वैशिष्ट्ये देम्यात आली आहेत. १९११मध्ये बांधण्यात आलेला हा जुना दरबार अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६साली नवा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला तर २०१९मध्ये या दरबाराचे बांधकाम सुरू झाले. मात्र कोरोना काळात बांधकामास अधिक वेळ लागला असून अखेर २०२१मध्ये या दरबाराचे काम पूर्ण झाले.

८ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्य हस्ते या नव्या दरबाराचे उद्घाटन होणार होते. मात्र तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या निधनामुळे हा उद्घाटन सोहळा स्थगित करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number