मुंबई जिल्हा बँकेवर प्रवीण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल हाती लागला असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सहकार पॅनलला मुंबई बँक निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळाले असून २१ पैकी २१ जागांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या […]

मुंबई जिल्हा बँकेवर प्रवीण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निकाल हाती लागला असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सहकार पॅनलला मुंबई बँक निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळाले असून २१ पैकी २१ जागांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाल्यामुळे, मुंबईकरांना कुठल्याही गोष्टीला, प्रलोभनाला आणि धमक्यांना न घाबरता सहकार पॅनलला यश दिले असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

मुंबई सहकारी बॅंक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली होती. आणि उर्वरित ४ जागांवर प्रत्यक्ष निवडणूक झाली. या निवडणुकीत चारही जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. सहकार पॅनेलमधल्या राखीव मतदारसंघातून अनिल गजरे विजयी झाले आहेत, तर मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलमधील विठ्ठलराव भोसले, महिला सहकारी संस्था मतदार संघातन जयश्री पांचाळ आणि प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे मुंबई जिल्हा बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number