आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी […]

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या अटकेनंतर किरण गोसावी मोठ्या चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.

मात्र, प्रभाकर साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्यसरकारने या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number