देशभरात प्लास्टिक बंदी; मुख्यमंत्र्यांचे स्वच्छता अभियानात सहभाग

संपूर्ण देशात फादर ऑफ नेशन अर्थात महात्मा गांधी यांची 150 वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छता अभियान राबविले जात आहे. एकीकडे संपूर्ण देशभरात प्लास्टिक बंदी केली जात असून दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सायन-कोळीवाडा परिसरातील संगमनगर येथे हातात झाडू घेऊन कचरा साफ करत असल्याचे […]

देशभरात प्लास्टिक बंदी; मुख्यमंत्र्यांचे स्वच्छता अभियानात सहभाग

संपूर्ण देशात फादर ऑफ नेशन अर्थात महात्मा गांधी यांची 150 वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छता अभियान राबविले जात आहे. एकीकडे संपूर्ण देशभरात प्लास्टिक बंदी केली जात असून दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सायन-कोळीवाडा परिसरातील संगमनगर येथे हातात झाडू घेऊन कचरा साफ करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शाळेतील विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले.

मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता अभियानात सहभाग –

दरवर्षा प्रमाणे यंदाही 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छा अभियान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुंबईच्या सायन-कोळीवाडा परिसरात हातात झाडू घेऊन कचरा साफ करत असून स्थानिकांना स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांसह शाळेतील विद्यार्थी देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याचे समजते आहे.

संपूर्ण देशभरात प्लास्टिक बंदी –

गेल्या वर्षभरापासून देशात एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्य सरकारने आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी करण्यात आल्या असून प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलच्या वस्तुंवर बंदी घालण्यात सरकारचा प्रयत्न सुरू आहे.

यापूर्वी पर्यावरण मंत्रालयाने सरकारी कार्यालय, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकचा आणि प्लास्टिकपासून तयार होणारे वस्तूंचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number