विरोध फक्त राज यांनाच – बृजभूषण सिंह

शिवसेनेचा आमदार तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर राज्यातील शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आम्ही विरोध करणार नाही, आमचा विरोध फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला आहे, असे भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर भारतीयांचा कोणाशीही वैर नाही. […]

विरोध फक्त राज यांनाच – बृजभूषण सिंह

शिवसेनेचा आमदार तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर राज्यातील शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आम्ही विरोध करणार नाही, आमचा विरोध फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला आहे, असे भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

उत्तर भारतीयांचा कोणाशीही वैर नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला अयोध्येत येण्यापासून विरोध नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती अयोध्येत येऊ शकते. मात्र, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कायम विरोध असल्याचे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि अयोध्येत यावे, असे बृजभूषण सिंह म्हणाले.

आदित्य ठाकरे ज्या दिवशी अयोध्येत येणार आहेत, त्या दिवशी मी इथे नाही. त्यामुळे मी त्यांचे स्वागत करू शकत नाही. तर त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा प्रश्न येत नाही. आमचा विरोध फक्त राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला असून त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे बृजभूषण सिंह म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number