राष्ट्रवादीकडून खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. आज खडसे आणि निंबाळकर उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत. भाजपाचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालणारे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे खडसेंचे पुनर्वसन होणार आहे. बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि […]

राष्ट्रवादीकडून खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. आज खडसे आणि निंबाळकर उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत. भाजपाचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालणारे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे खडसेंचे पुनर्वसन होणार आहे.

बुधवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. याबाबत दोन्ही उमेदवारांना कळवण्यात आले असून आज दुपारच्या सुमारास दोन्ही उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत.

खडसेंच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीला फायदा

  • एकनाथ खडसे यांना विधिमंडळाच्या कामाचा अनुभव.
  • आक्रमक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व.
  • विरोधकांना सळो की पळो करुन सोडू शकतात.
  • मुद्दा पटवून देण्यात पटाईत.
  • उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वाढीला त्यांचा उपयोग होईल.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेत जागा दहा आहेत मात्र, उमेदवार १२ आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपात लढाई होणार असून विधानसभा निवडणुकही चांगलीच चुरशीची होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number