एफआरपीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक

शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळावा यासाठी विधानभवनाच्या परिसरात विरोधक आक्रमक झाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केले. उसाच्या मोळ्या […]

एफआरपीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक

शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळावा यासाठी विधानभवनाच्या परिसरात विरोधक आक्रमक झाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केले. उसाच्या मोळ्या हातात घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एक रकमी एफआपी मिळावा, शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राज्यात ऊसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे त्या सर्व ऊसाची खरेदी होईपर्यंत गाळप बंद करू नये, अशी मागणी  गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफारपीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. ऊसाची एफआरपी एक रकमी एफआरपी देण्याची राजू शेट्टी यांची मागणी राज्य सरकारने फेटाळली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number