मेळाव्यानिमित्त मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये फलकबाजी

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ मुंबईतल्या […]

मेळाव्यानिमित्त मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये फलकबाजी

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता.आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number