गौतम नवलखा यांना पुस्तक देण्यास एनआयएचा नकार

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणी अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना एनआयएने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक वाचण्यास देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. ‘मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक […]

गौतम नवलखा यांना पुस्तक देण्यास एनआयएचा नकार

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणी अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना एनआयएने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक वाचण्यास देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

‘मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक देण्यास नकार देणे चुकीचे आहे. प्रसिद्ध विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस हे पु. ल. देशपांडे यांचे प्रेरणास्थान होते. वुडहाऊस सुरक्षेसाठी धोका मानला जातो? हे खरोखरच हास्यास्पद आहे’, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे.

तसेच, गौतम नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी सांगितले की, पी. जी. वुडहाऊस यांचे विनोदी पुस्तकही कुटुंबीयांनी पाठविले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पुस्तके देण्यास एनआयए तपास संस्थेने नकार दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number