देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख वरचढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवी नियमावली जाहीर झाली आहे. एका इमारतीमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर बुधवारी मुंबईत १५ हजार १६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे नियम जाहीर केले आहेत. इमारतीच्या एखाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला सील करण्यात येईल तर इमारतीमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल. तसेच नागरिकांना १४ दिवसांचे विलगीकरण सक्तीचे असून रुग्ण असलेल्या ठिकाणी बाहेर जाण्यास बंदी घालण्या आली आहे.
बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी राज्यात २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झोली आहे. तर मुंबईत बुधवारी १५ हजार १६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. तर ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.