‘विक्रांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यानंतर पुत्र नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
सत्र न्यायालयात नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलावर अद्यापही कायम आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हा शाखा करणार आहे.
किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर काल सुनावणी पार पडली असून त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आज नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.