आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आजही विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याच दिसले. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका दिवसात महाराष्ट्र विकून खाईल, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.
पत्रकारांशी संवाद साधतांना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला. आव्हाड माझा बाप काढतात, ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून, मुख्यमंत्र्यांच्या जवळ जातील, याहून जास्त आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरही भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्यतेची हेळसांड करू नये, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.