गणेश नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशनानंतर नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गणेश नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. नाईक यांना तत्काळ अटक करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पोलीस उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गणेश नाईक यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता ३७६ (२) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात […]

गणेश नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशनानंतर नाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गणेश नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. नाईक यांना तत्काळ अटक करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पोलीस उपायुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

गणेश नाईक यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता ३७६ (२) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन ३ दिवस झाले तरीही अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे गणेश नाईक यांना तत्काळ अटक करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर धडक मोर्चा काढण्यात आला.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, आता गणेश नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number