केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र नारायण राणे चौकशीसाठी हजर राहिले नाही. याप्रकरणावरून कणकवलीत वातावरण चांगले तापले आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई हा गृहखात्याचा विषय असून नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नितेश राण कुठे आहेत? हे नारायण राणे यांना माहित आहेत त्यामुळे त्यांनी पोलिसांन त्याबद्दल माहिती द्यावी तसेच राज्यात कायद्याची उत्तम अंमलबजावणी सुरू असून केंद्रीय मंत्र्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, असेही ते म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांना माहित असलेली माहित त्यांनी पोलिसांनी देऊन त्यांना सहकार्य करावे अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिला आहे.
तसेच नारायण राणे यांच्याघराबाहेर नोटीस लावणे हा किरकोळ मुद्दा आहे. देशाच्या राष्ट्रपतींनाही सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसा येतात. त्यामुळे राणेंच्या घराबाहेर नोटीस लागणे यात काही चुकीचे नाही. त्यामुळे नारायण राणे यांना बजावलेल्या नोटीसीला राणेंनी सहकार्य करावे, असे संजय राऊत म्हणाले.