विकास पाठकला नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावरून विद्यार्थ्यांना भडकविल्यामुळे हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला धारावी पोलिसांनी अटक केली होती. परंतु १७ फेब्रुवारी रोजी विकास पाठकला जामिन मंजूर झाला होता. मात्र, आता पुन्हा विकास पाठकला नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या अटकेतून सुटका होताच विकास पाठकला नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नागपूर पोलीस ठाण्यात […]

विकास पाठकला नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावरून विद्यार्थ्यांना भडकविल्यामुळे हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला धारावी पोलिसांनी अटक केली होती. परंतु १७ फेब्रुवारी रोजी विकास पाठकला जामिन मंजूर झाला होता. मात्र, आता पुन्हा विकास पाठकला नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

पोलिसांच्या अटकेतून सुटका होताच विकास पाठकला नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नागपूर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश विकास पाठकला देण्यात आले आहेत.

‘हिंदुस्तानी भाऊ’चे आवाहन, आंदोलन भडकले

हिंदुस्तानी भाऊ नावाच्या अधिकृत अकाऊंटवरून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. हिंदुस्तानी भाऊच्या आवाहनानंतर आंदोलक विद्यार्थी भडकले असून विद्यार्थी राज्यभरात ऑफलाईन परिक्षांच्याविरोधात रस्त्यावर आले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाले.

विद्यार्थ्यांना चिथवण्यामध्ये हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे समोर आले. त्यामुळे विना परवानगी गर्दी करणे, आंदोलन करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, दंगल करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे या आरोपांमध्ये हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला अटक झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number