राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. तर काही कोरोना बाधितांमध्ये अनेकदा सौम्य अथवा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी त्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबाबत मुंबई महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सौम्य लक्षणे किंवा कुठलीही लक्षणे नसतील अशी व्यक्ती गृह विलगीकरणात राहू शकते.
संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सूचना.
६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर गृहविलगीकरणात राहण्याची अनुमती.
डायबेटिक, हायपर टेन्शन, हृदयविकार, किडनीविकार असलेल्या रुग्णांना डॉक्टरी सल्ल्यानंतर अनुमती.
रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल अशा कोरोना रुग्णांना डॉक्टरांची परवानगी अत्यावश्यक.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातल्या सदस्यांनी गृह विलगीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यांवर आहे अशा महिला रुग्णाला गृह विलगीकरणात ठेवण्यास प्रतिबंध.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने विलगीकरणादरम्यान एका खोलीमध्ये आयसोलेट करणं बंधनकारक.
विलगीकरणादरम्यान रुग्णाने ट्रिपल लेअर किंवा एन ९५ मास्कचा वापर करावा, दर आठ तासाने मास्क बदलावे.
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने इतरांसोबत कोणत्याही वस्तू शेअर करू नयेत किंवा इतरांच्या वस्तू वापरू नयेत.
स्वतः शरीराचे तापमानासोबतच ऑक्सिजनची पातळी तपासावी.
गृह विलगीकरणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःहून स्वच्छता ठेवावी.