विधानसभेत नाना पटोलेंच्या विधानावर मुनगंटीवारांचा आक्षेप, म्हणाले…

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात घोडेबाजार शब्दावरून जोरदार जुगलबंदी झाली. घोडेबाजार थांबवण्याची आमची भूमिका असल्याचे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. ‘विधिमंडळ म्हणजे तबेला आहे का?’ […]

विधानसभेत नाना पटोलेंच्या विधानावर मुनगंटीवारांचा आक्षेप, म्हणाले…

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यात घोडेबाजार शब्दावरून जोरदार जुगलबंदी झाली.

घोडेबाजार थांबवण्याची आमची भूमिका असल्याचे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. ‘विधिमंडळ म्हणजे तबेला आहे का?’ असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

विधानसभेत मांडण्यात आलेल्या अध्यक्षांची निवड आवाजी मतदाराने करण्याच्या प्रस्तावावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पक्षांतर बंदी कायदा हा घोडेबाजार बंद व्हावा म्हणून निर्णय घेतला होता. आता घोडेबाजार म्हटल्याने विरोधकांना त्रास का होत आहे, असा टोला यावेळी नाना पटोले यांनी लगावला होता. त्याला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले आहे. विधिमंडळ म्हणजे तबेला आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number