मुंबई : लहान मुलांना आता झायकॉडी लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नायर रुग्णालयात ५० मुलांना लस देण्यात येणार आहे. ‘झायडस कॅडिला’ कंपनीने पालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे . त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यामध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
मात्र ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असून लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने जम्बो कोविड केंद्र, कोरोना काळजी सेंटरमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी लहान मुलांचे विभाग सुरू करण्याचे नियोजन केले आहे.