पेंटाग्राफवर कमरेचा बेल्ट फेकल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी कामावर जायच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली होती.मानखुर्द रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पूर्वपदावर करण्याचे काम सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.यापूर्वीही अनेकदा हार्बर लाइनवर लोकल वाहतूक […]

पेंटाग्राफवर कमरेचा बेल्ट फेकल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

आज सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी कामावर जायच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली होती.मानखुर्द रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पूर्वपदावर करण्याचे काम सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.यापूर्वीही अनेकदा हार्बर लाइनवर लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.हार्बर रेल्वेमार्गावर लोकल वाहतूक  सुरळीत करण्यात आली आहे.पेंटाग्राफ तुटल्याने  वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना वारंवार होतचं असतात. परंतु रेल्वेच्या पेंटाग्राफवर कुणीतरी कमरेचा बेल्ट फेकल्याने वायर तुटून लोकल ठप्प झाली असल्याची माहीती रेल्वे प्रशासनानं ट्विटरद्वारे दिली आहे.

हार्बर रेल्वेमार्गावर लोकल वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली.

सकाळी सहा-सव्वासहाच्या सुमारास मानखुर्द स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली होती.

मानखुर्द-पनवेल मार्गावरील लोकल वाहतूक काही वेळासाठी ठप्प करण्यात आली हाती.

याचा परिणाम सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर देखिल झाला आहे.

दरम्यान ओव्हरहेड वायर जोडण्याचे झाल्याने वाहतूक पुर्ववत झाली आहे.

हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याचा मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

प्रशासनानं लगेचच  दुरुस्तीचं काम सुरू केलं.आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

दुरुस्तीचं काम सुरू असताना  रेल्वेच्या पेंटाग्राफवर कर्मचाऱ्यांना एक बेल्ट आढळून आला.

या बेल्टमुळे  ओव्हरहेड वायरच्या तुटली आहे असं ट्विट रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number