मुंबई पोलिसांकडे सचिन वाझेचा ताबा

  मनसुख हिरेन हत्येप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा मुंबई पोलीस गुन्हे शाखेला मिळाला आहे. तसेच सचिन वाझे यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून मुंबई पोलिस गुन्हे शाखा तळोजा तुरुंगातून सचिन वाझेचा ताबा घेण्यात आला आहे.   सचिन वाझे यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाने खंडणीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी […]

मुंबई पोलिसांकडे सचिन वाझेचा ताबा

  मनसुख हिरेन हत्येप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा मुंबई पोलीस गुन्हे शाखेला मिळाला आहे. तसेच सचिन वाझे यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून मुंबई पोलिस गुन्हे शाखा तळोजा तुरुंगातून सचिन वाझेचा ताबा घेण्यात आला आहे.

  सचिन वाझे यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाने खंडणीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वाझेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याप्रकरणी अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सचिन वाझे यांचा ताबा मागितला. तळोजा तुरुंगात सचिन वाझे यांची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून सचिन वाझेला दहा दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती, मात्र न्यायालयाने सचिन वाझे यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number