Ritu Tawade : रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी संबंधित 2016 सालच्या शिक्षक मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने रितू तावडे यांच्यासह काही आरोपींन प्रत्येक 300 रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. वैयक्तिक उपस्थितीमधून सूट मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेला हा अर्ज न्यायालनयाने मंजूर केला होता. मात्र, आरोपींना दंडाची […]

Ritu Tawade : रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
महापौर रितू तावडेंना कोर्टाचा दणका

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी संबंधित 2016 सालच्या शिक्षक मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने रितू तावडे यांच्यासह काही आरोपींन प्रत्येक 300 रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. वैयक्तिक उपस्थितीमधून सूट मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेला हा अर्ज न्यायालनयाने मंजूर केला होता. मात्र, आरोपींना दंडाची रक्कम भरण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत.

घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,वाकोला परिसरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकाला मारहाण केल्याचा गुन्हा हा रितू तावडे यांच्यासह सात जणांविरोधात होता. या प्रकरणात एकूण आठ आरोपींवर न्यायालयीन कारवाई सुरू आहे. या खटल्याच्या मागील सुनावणीदरम्यान रितू तावडे न्यायालयात उपस्थित राहील्या नव्हत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देत असताना शेवटची संधी ही दिली होती.

हेही वाचा-Crime : मुलीच्या प्रेमविवाहाचा राग अनावर; गावकऱ्यांनी कुटुंबासोबतच…; अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार

मात्र, त्यानंतर झालेल्या सुनावणीलाही तावडे यांच्यासह अन्य काही आरोपी गैरहजर राहीले होते. त्यामुळे आरोपींकडून पुन्हा एकदा वैयक्तिक उपस्थितून सूट मिळावी, त्यासाठी हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

वारंवार गैरहजेरी तसेच वैयक्तिक उपस्थितीमधून सूट मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. नव्याने दाखल करण्यात आलेल्या उपस्थितीमधून सूट देण्याचा अर्ज मंजूर करत असताना न्यायालयाने रितू तावडे यांच्यासह संबंधित आरोपींना 300 रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप निश्चितीची प्रक्रिया ही पूर्ण झाली असून सध्या साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.त्यामुळे आगामी सुनावण्यांमध्ये आरोपींची उपस्थिती आणि साक्षीदारांचे जबाब याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number