आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एक भीषण रस्ते अपघात झालेला आहे. सोनारी भागातील मरीन ड्राइव्हवर गुरुवारी पहाटे 3 वाजता भरधाव कार रसत्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. याच अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरात होती की,ट्रकच्या मागच्या भागात घुसली आणि तिचा अक्षरशा चक्काचूर झाला. या अपघातात झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंह यांची मुलगी तृषा सिंह हिचाही मृत्यू झालेला आहे.
मरीन ड्राइव्हवर काळरात्र
मृतांची नावे सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता, वंशिका खंडेलवाल आणि तृषा सिंह अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक बुधवार साधारण रात्री 10 वाजल्यापासून खराब होऊन रस्त्यावरच उभा होताय पहाटेच्या असलेल्या अंधारात हाच भरधाव वेगात आलेल्या कारला तो दिसला नाही आणि कार थेट याच ट्रकमध्ये घुसली. कारमध्ये अडकलेल्या सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरने ही कार कापावी लागली.
या घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपली मुलगी गमावण्याचे दु:ख हे शब्दात सांगता येत नाही. या कठीण काळात आम्ही पीडित कुटुंसोबात आहोत. पोलीस सध्या या अपघाताची चौकशी करत असून ट्रकच्या मागे सुरक्षेसाठी काही सिग्नल लावला होता का, यासह सर्व बाजूंनी तपास करत आहेत.