राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आली असली तरीही होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारचे हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहेत. जर हे नियम पाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाण्याचा इशाराही गृह मंत्रालयाने दिला आहे.
रात्री दहाच्या आत होळीच दहन करावे लागणार.
होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेमुळे नियमावली जारी.
मद्यपान करून बीभस्त वर्तन केल्यास कारवाई करणार.
धार्मिक भावना न दुखावण्याच्या सूचना.
जबरदस्तीने रंग लावण्यास मनाई.