मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई शहरातील दररोजच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. संपूर्ण गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई शहरातील वाहतुकीत हा बदल करण्यात आला. मुंबई शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील बऱ्याच भागातील मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदलाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून पर्याय मार्ग देखील नागरिकांसाठी सांगण्यात आले आहेत.
मुंबईची वाहतूक व्यवस्था बदलणार
यंदाच्या गणेशोत्सवनिमित्ताने लालबाग, परळ आणि काळाचौकी या प्रमुख परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. थेट 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान
हे 7 मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरते बंद राहणार आहेत. गणेशोत्सवातील असंख्य होणारी गर्दी आणि लहान-मोठ्या मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, त्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
12 दिवस कोणते रस्ते बंद?
1) डॉ.बी.ए.या रोडवरील भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंड जंक्शनदरम्यान वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे. महादेव पालव मार्गावर करी रोड येथील शिंगटे मास्तर चौक ते भारतमाता जंक्शनपर्यंत वाहतूक ही बंद असणार आहे.
2) संत जगनाडे महाराज चौक येथे साने गुरुजी मार्गावरुन डॉ.बी.ए. रोडकडे जाणारे उजवे वळण हे बंद राहील. तर दत्ताराम लाड मार्गावर असलेले उडपी हॉटेल ते शांताराम पुजारी चौकदरम्यान ही वाहतूक बंद राहणार आहे.
3)गणेशनगर लेन अर्थात (चिवडा गल्ली) डॉ.बी.ए. रोड जंक्शन ते पूजा हॉटेल जंक्शनपर्यंत वाहतूक बंद राहीलय दिनशॉ पेटिट लेन देखील डॉ.बी.ए.रोड जंक्शन ते गणेशनगर लेन जंक्शनपर्यंत बंद राहणार आहे. तर डॉ.एस.एस.राव रोडवरील सदाशिव गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलिस चौकीदरम्यान वाहतूक ही बंद राहील.
हे पादचारी पूलही बंद
रस्ते तर दुसरीकडे मशीद परिसरातील भंडारी पादचारी पूल आणि मशीद स्थानकावरील असलेला पादचारी पूल बंद करण्यात आलेला आहे. शिवाय माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील पादचारी पूल आणि गुरु नानक हायस्कूलजवळी असलेला माटुंगा-धारावी पादचारी पूल देखील बंद करण्यात आला आहे.आयआयटी मुंबईच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलांच्या बऱ्याच भागांना गंज लागल्याचे तसेच ते असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलांवरील पाचदारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.