मोटरमनना केबिनमध्ये सीसीटीव्ही नकोत; 4 मेपासून मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत

मुंबई: मध्य रेल्वेने लोकल मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. 'कामाच्या ठिकाणी सतत निरीक्षणाखाली राहणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे,' असा आक्षेप मोटरमन संघटनांनी नोंदवला असून, हा निर्णय 3 मेपर्यंत मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अन्यथा 4 मेपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची […]

मोटरमनना केबिनमध्ये सीसीटीव्ही नकोत; 4 मेपासून मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या तयारीत

मुंबई: मध्य रेल्वेने लोकल मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. 'कामाच्या ठिकाणी सतत निरीक्षणाखाली राहणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे,' असा आक्षेप मोटरमन संघटनांनी नोंदवला असून, हा निर्णय 3 मेपर्यंत मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अन्यथा 4 मेपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकलच्या मोटरमनकडून अनेकदा स्थानकात्तील थांबा विसरणे, वेगमयदिचे उल्लंघन होणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे इत्यादी प्रकार घडत असतात. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघाताची शक्यता असते.अशा घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा आणि पुरावे मिळावेत, म्हणून लोकलमधील मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत., तरी मोटरमनच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे त्यांच्या कामावर संशय घेतल्याचा भाव निर्माण होतो. थोड्याशा चुकांसाठी संपूर्ण जबाबदारी मोटरमनवर टाकली जाते, त्यामुळे आधीच मानसिक दडपणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिक ताण येतो, असा आरोप त्यांनी केला आहे.

कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, अपघात टाळण्यासाठी उपाय आवश्यकच आहेत, पण त्यासाठी समाधानकारक संवाद आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीऐवजी प्रशिक्षणे, वेळोवेळी पुनरावलोकन आणि कर्मचार्‍यांच्या मन:स्थितीचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा हा एकतर्फी निर्णय मोटरमनच्या संतापाला कारणीभूत ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number