‘२०२४मध्ये केंद्रात मोदी सरकार येणार’ – देवेंद्र फडणवीस

तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईत ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांचा दौरा पूर्णत: राजकीय असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०२४मध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी […]

‘२०२४मध्ये केंद्रात मोदी सरकार येणार’ – देवेंद्र फडणवीस

तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईत ममता बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांचा दौरा पूर्णत: राजकीय असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०२४मध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याच विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या मजबूत राज्य आहे. मुंबईत वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात काँग्रेसला बाजूला ठेवून ममता राजकीय मोट बांधत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

देशात काँग्रेस पक्षाला वगळून आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आहे. आणि यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ आहे. ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत. तर शरद पवार साहेब हे बिटवीन द लाईन बोलणार आहेत. त्यामुळे दोघांचे बोलणे एकच असून दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number