‘ईदपूर्वी भोंगे उतरवा अन्यथा…’ – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तरसभा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर राज ठाकरे सभेत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे सभेच्या स्थळाकडे पोहचले आहेत. LIVE UPDATE : ‘एसटी आंदोलनाकडे मविआचे दुर्लक्ष’ […]

‘ईदपूर्वी भोंगे उतरवा अन्यथा…’ – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तरसभा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर राज ठाकरे सभेत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरे सभेच्या स्थळाकडे पोहचले आहेत.

LIVE UPDATE :

‘एसटी आंदोलनाकडे मविआचे दुर्लक्ष’

राज्यात गेल्या पाच महिन्यांहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच, एसटी आंदोलकांचे आयुष्य उध्वस्त झाले असल्याचेही ते म्हणाले.

‘मराठा आरक्षण कुठं गेलं?’

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील मांडला. राज्यात मराठा आरक्षण कुठं गेलं? असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडला. तसेच मराठा आरक्षण ही मतांसाठी चिथावणी होती, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या निशाण्यावर संजय राऊत

राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या शिवराळपणावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणजे लवंडे असे म्हणत, लवंडे म्हणजे धरसोड भूमिका घेणारी व्यक्ती असे राज ठाकरे म्हणाले.

‘माझी हिंदुत्वाची भूमिका जुनीच’

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला. माझी हिंदुत्वाची भूमिका जुनीच असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पाकिस्तानी कलाकारांविरोधात राज्यात मनसेने आवाज उठवला. तसेच आझाद मैदान दंगलीविरोधातही मनसे रस्त्यावर उतरली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

‘शरद पवारांनी कायम भूमिका बदलली’

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी कायम भूमिका बदलली आहे. तसेच पवारांच्या तोंडी कधीच शिवरायांचे नाव आले नाही, कारण शिवरायांचे नाव घेतले तर मुसलमान नेते नाराज होतील. त्यामुळे राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहेत.

राज यांच्या निशाण्यावर जितेंद्र आव्हाड

राज ठाकरे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. आव्हाडांच्या चेहऱ्याला राज ठाकरेंकडून नागाच्या फण्याची उपमा देण्यात आली. तसेच मुंब्र्यातील अतिरेकी कारवायांची राज ठाकरे यांनी जंत्री सादर केली.

ईदपूर्वी भोंगे उतरवा अन्यथा…

ईदनिमित्त राज ठाकरे यांनी मविआला सूचना दिल्या आहेत. मशिदीवरील भोंगे ईदपूर्वी खाली उतरवा. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाहीत. भोंगे खाली उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणारच, असे राज ठाकरे म्हणाले.

‘मशिदीवरील भोंग्यांचा देशाला त्रास’

राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरील भोंग्यांचा देशाला त्रास होत आहे. भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो. त्यामुळे ते भोंगे उतरवले पाहिजे. आणि जर सांगून समजत नसेल तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच भोंग्याच्या भूमिकेबाबत आता आम्ही माघार घेणार नाही, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

अजित पवारांच्या विरोधात व्हिडिओ बाण

राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या विरोधात व्हिडिओ बाण केला. मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी केलेली जुनी वक्तव्ये सादर केली.

‘स्वकीयांच्या चुकांमुळे भुजबळ तुरुंगात’

स्वकीयांच्या चुकांमुळे मंत्री छगन भुजबळ तुरुंगात गेले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. भुजबळ यांना त्यांच्या संस्थेतील गैरव्यवहारांमुळे तुरुंगात जावं लागलं. तर, तुरंगात जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले, आणि तुरुंगातून आल्यावर मंत्रीपदाची शपथ घेणारे भुजबळ पहिले नेते आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील यांचे जंत पाटील असे नामकरण

राज ठाकरे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी मंत्री जयंत पाटील यांचे ‘जंत पाटील’ असे नामकरण करत उल्लेख केला. जयंत पाटील यांचा चकित चंदू असाही उल्लेख राज ठाकरे यांनी केला.

‘सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे सुळे वेगळे’

राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधाला. सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे सुळे वेगळे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरीच छापा कसा? असा सवालही राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना उपस्थित केला आहे.

‘देशात समान नागरी कायदा आणा’

देशात समान नागरी कायदा आणला तर या देशातील लोकसंख्येवरही नियंत्रण आणता येईल, अशा कायद्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे या गोष्टी देशात होणे आवश्यक आहे.

राज ठाकरेंचा ईडी नोटिशीवर खुलासा

राज ठाकरेंनी ईडी कारवाईबाबतही भाष्य केले. राज ठाकरेंनी ईडी नोटिशीवर खुलासा केला असून आयएल एँड एसएस चौकशीबाबत ईडीची नोटीस आहे. मी कधीही ट्रॅक बदललेला नाही. मी ईडीच्या कार्यालयात गेलो, राज ठाकरे म्हणाले.

सिल्वर ओक आंदोलनावरून मविआ निशाण्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिल्वर ओक आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. पोलिसांना सिल्वर ओक आंदोलन कळालं नसेल? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार हे तपास यंत्रणांना कळाले होते, परंतु एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी जाणार हे त्यांना माहित नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अकलेचे तारे तोडणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे 

गुढीपाडवा मेळाव्यात सभ्या झाल्यावर अनेकांनी अकलेचे तारे तोडले. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. पत्रकार परिषद घेत त्यांना उत्तर दिले असते तर विषय भरकटला असता. त्यामुळे ठाण्यात मनसेच्या सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच ही जागा आता राज्यात अनेक ठिकाणी दाखवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number