अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांना ईडीकडून सलग आठ तास चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास ईडीने मलिकांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंर नवाब मलिक स्वत: ईडी चौकशीसाठी तयार झाले. त्यानंतर ईडीने नवाब मलिकांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना […]

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांना ईडीकडून सलग आठ तास चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिकांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास ईडीने मलिकांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंर नवाब मलिक स्वत: ईडी चौकशीसाठी तयार झाले. त्यानंतर ईडीने नवाब मलिकांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आल्यामुळे ईडी कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर मलिक समर्थकांकडून ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number