मंत्री उदय सामंत बोगस डिग्री प्रकरण: सामंत यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (UDay Samant) यांची बोगस डीग्री प्रकरण पुढे आलं आहे. पुण्यातील RTI चे कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी हा सारा प्रकार पुढे आणलाय. या प्रकरणानंतंर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात (Gyaneshwar University) शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही,’ असं […]

मंत्री उदय सामंत बोगस डिग्री प्रकरण: सामंत यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (UDay Samant) यांची बोगस डीग्री प्रकरण पुढे आलं आहे. पुण्यातील RTI चे कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी हा सारा प्रकार पुढे आणलाय.

या प्रकरणानंतंर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

‘ज्ञानेश्वर विद्यापीठात (Gyaneshwar University) शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही,’ असं सष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय.

‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जायचं आणि त्याची डिग्री (Degree) दिली जायची तशी मी घेतली. त्या डीग्रीचा फायदा घेऊन कुठलं शासकीय घरं घेतलं नाही. त्याचा फायदा घेऊन शासकीय फायदा घेतला नाही’ असं सष्ट मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सष्ट केलंय.

ज्यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणलंय त्यांचा हेतू काय हे तपासण्यासाठी प्रयत्न करणार असंही उदय सामंत म्हणाले.

प्रॅक्टिकल अभ्यास करून माझा व्यवसाय सुरु करण्यासाठी मी तिथं शिकलो.

त्यामुळे आता 27 वर्षानंतर जो मानसिक त्रास मला होतोय.

त्यामुळे अशी विद्यापीठ असतील तर त्यातून वेगळं होत असेल तर त्याची नक्की चौकशी होणार असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

यातून आम्ही निवडणुक आयोगाला किंवा सरकारला फसवलेलं नाही त्यामुळे विरोधीपक्ष नेत्यांनी विनोद तावडे आणि माझी सुद्धा याची चौकशी करावी असं खुलं आव्हान उदय सामंत यांनी दिलंय.

मात्र राज्यातील अशी विद्यापीठं लोकांना फसवण्यासाठी तयार झाली असतील तर नक्की चौकशी होणार. मला थांबण्यासाठी माझ्या विरोधात षडयंत्र असल्याचा दावासुद्धा उदय सामंत यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number