मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. तर नारायण राणे यांच्याकडून शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही टीका केली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी केलेल्या टीकेला नार्वेकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी ट्वि केले की, ‘बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’, असे ट्विट करत टोला लगावला आहे.
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane — Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
नारायण राणे म्हणाले, संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यावर बाहेर काढणार आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नाहीत तर ते राष्ट्रवादीचे आहेत. तसेच शिवसेना संपवण्याची संजय राऊतांना सुपारी घेतली असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.