रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबई : रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रविवार २१ जुलै २०२४
रेल्वेचा मेगाब्लॉक
- मध्य रेल्वे मुख्य मार्ग – माटुंगा ते मुलुंड येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक – सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.०५
- हार्बर रेल्वे मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे आणि चुनाभट्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर मेगाब्लॉक – सकाळी ११.१० ते संद्याकाळी ०४.४०
- ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग – मेगाब्लॉक नाही
- उरण रेल्वे मार्ग – मेगाब्लॉक नाही
- पश्चिम रेल्वे मार्ग – मेगाब्लॉक नाही