Megablock On Mumbai Local : मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघा; नंतर करा रविवारच्या प्रवासाचं नियोजन

मुंबईकरांना येत्या रविवारीदेखील रेल्वे मार्गाच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.

Megablock On Mumbai Local : मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघा; नंतर करा रविवारच्या प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईकरांना येत्या रविवारीदेखील रेल्वे मार्गाच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुले प्रवाशांचे लोकल प्रवासादरम्यान मेगाहाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक मध्य आणि हार्बर मार्गावर असून त्याची नियोजित वेळ देण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र मेगाब्लॉक नसल्याने दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा : Sharad Pawar : अजित दादांच्या निधनाने कोलमडून गेलेले शरद पवार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; 40 वर्षांनी बारामतीची सूत्रं पुन्हा हाती

या मार्गांवरील रेल्वे वेळापत्रकात बदल

ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर 10.40 ते 15.40 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) मुंबई येथून 9.34 ते 15.03 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद तर अर्ध-जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.
या सेवा त्यांच्या नियोजित स्थानकांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबतील व सुमारे 10 मिनिटे उशिरा त्या-त्या स्थानकांवर पोहोचतील.
कल्याण येथून 10.28 ते 15.40 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद व अर्ध-जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.
या सेवा त्यांच्या नियोजित स्थानकांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकांवर थांबतील व पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
या सेवा सुमारे 10 मिनिटे उशिरा त्या-त्या स्थानकांवर पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान 5व्या मार्गावरून वळविण्यात येतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे/विक्रोळी दरम्यान 6व्या मार्गावरून वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील वेळापत्रक 

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर 11.10 ते 16,10 वाजेपर्यंत ब्लॉक राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 15.36 दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल बेलापूर/वाशी येथून 10.17 ते 15.47 दरम्यान (छशिमट) मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

ब्लॉक कालावधीत (छशिमट) मुंबई – कुर्ला तसेच पनवेल – वाशी विभागात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत 10.00 ते 18.00 या वेळेत ठाणे–वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number