पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी बैठक

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रगतीमध्ये बसलेला खोडा शुक्रवारी दूर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यात पुणे-नाशिक रेल्वेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे आता तीन जिल्हे एकमेकांना जोडले […]

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी बैठक

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रगतीमध्ये बसलेला खोडा शुक्रवारी दूर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यात पुणे-नाशिक रेल्वेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पामुळे आता तीन जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्याशिवाय या भागातील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच या भागांतील उद्योगाच्या दृष्टीनेदेखील हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी हवेली तालुक्यातील १२ गावांमधून हा प्रकल्प जात आहे. त्यापैकी सात गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. अन्य गावांची मोजणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होइल; तसेच दोन गावांसाठी नगररचना विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यापैकी एक परवानगी केंद्रांकडून रखडली आहे; तसेच नवीन अलाइन्मेंटनुसार संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे हवेलीच्या भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number