Shiv Sena UBT Protest: पदोन्नतीत मराठी माणसाला डावललं; खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत उबाठाचं LIC कार्यालयाबाहेर आंदोलन

एलआयसी प्रशासनाकडून मराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये (Promotions) डावलले जात असल्याचा आरोप करत ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Shiv Sena UBT Protest: पदोन्नतीत मराठी माणसाला डावललं; खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत उबाठाचं LIC कार्यालयाबाहेर आंदोलन

Shiv Sena UBT Protest: मुंबईतील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयासमोर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. एलआयसी प्रशासनाकडून मराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये (Promotions) डावलले जात असल्याचा आरोप करत ठाकरे सेना कमालीची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनामुळे एलआयसी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन 
हे आंदोलन शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी शिवसैनिकांनी एलआयसी प्रशासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. “मराठी माणसाची गळचेपी आता सहन केली जाणार नाही,” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. मुंबईत राहून मराठी माणसालाच डावलण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – Girish Mahajan: मंत्रिमंडळाच्या बैठकीत नसरापूर प्रकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, गिरीश महाजन काय म्हणाले?

मराठी अस्मितेचा मुद्दा आणि पदोन्नतीमधील भेदभाव
ठाकरे सेनेने आरोप केला आहे की, एलआयसीमध्ये काम करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. पात्र असूनही मराठी लोकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. “मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरेल,” असे सांगत जोपर्यंत हा भेदभाव थांबत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number