Nandurbar Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीत किरकोळ वादाचा भयंकर शेवट! हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहादा : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील कथार्डे खुर्द येथे घडली. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी मिरवणूक सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कथार्डे खुर्द येथे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मंडळासमोरून जात असताना […]

Nandurbar Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीत किरकोळ वादाचा भयंकर शेवट! हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Nandurbar Crime

शहादा : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील कथार्डे खुर्द येथे घडली. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी मिरवणूक सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कथार्डे खुर्द येथे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मंडळासमोरून जात असताना दंड थोपटल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Nagpur Crime: दारूसाठी पैसे मागितले, आईने नकार देताच मुलाचा संताप अनावर; चाकूने आईवर…; नागपुरात खळबळ

यावेळी मोघ्या दौलत भिल या 35 वर्षीय तरुणावर हाताबुक्क्यांसह लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मोघ्या भिल गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Local Train Accident : नियतीचा घाला! घर गाठण्याआधीच काळाने हिरावले,25 वर्षीय चित्राचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 189(2) आणि 190 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेमागील नेमका वाद, हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीसारख्या सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या वादातून थेट जीवघेणा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींची चौकशी तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे. पुढील तपासातून या हल्ल्यामागील संपूर्ण कारण आणि घटनेतील प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number