परिवहनमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारणारी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलबने जयसिंग राजपूत नामक व्यक्तीला बंगळुरू येथून अटक केली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ८ डिसेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा आरोपी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असून आदित्य ठाकरे सुशांत राजपूतच्या मृत्यूला जबाबदार ठरवत जीवे मारण्याची धमकी देणारा मॅसेज पाठवला. तसेच या आरोपीने आदित्य ठाकरे यांना तीन वेळा फोन केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला बंगळुरातून अटक केली.
आदित्य ठाकरे यांना मॅसेजद्वारे धमकी देण्यात आली होती. तसेच या आरोपीने आदित्य ठाकरे यांना तीनवेळा फोन केला होता. याच प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपीला अटक केली आहे.