मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे आजदेखील लसीकरण बंदच राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण नियमित सुट्टी म्हणून बंद राहील, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईकरांनो, १० जुलै, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसेच ११ जुलै रोजी नियमित साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहील. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू. — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 9, 2021
‘१० जुलै, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसेच ११ जुलै रोजी नियमित साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहील. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू’, असं ट्विट मुंबई महापालिकेनं केलं आहे.
लशींचा साठा उपलब्ध नसल्याचा चांगलाच फटका मुंबईतील लसीकरणाला बसला आहे. शुक्रवारपासून सलग तीन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.