महाराष्ट्र: राज्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात गुरुवारी ८ हजार १० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार ४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के आहे.
#CoronavirusUpdates
१५ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ५४५ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ५०५
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०४७६४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ७०१२ दुप्पटीचा दर- ९४८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ८ जुलै ते १४ जुलै)- ०.०७ % #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 15, 2021
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गुरुवारी ५४५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७लाख ४ हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के झाला आहे. तर मुंबईत गुरुवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ७,०१४ रुग्ण सक्रिय आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 948 दिवसांवर गेला आहे.