लालबागच्या राजाच्या दानपेटीत १० दिवसांत सहा कोटी

लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या भेटवस्तूंचा जाहीर लिलाव शनिवारी सायंकाळी होणार आहे.

लालबागच्या राजाच्या दानपेटीत १० दिवसांत सहा कोटी

मुंबई – लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या भेटवस्तूंचा जाहीर लिलाव शनिवारी सायंकाळी होणार आहे. लालबागचा राजाच्या मंडपात हा लिलाव होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे. दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या स्वरुपात दान करत असतात. गेल्या काही वर्षांपासून या दानामध्ये वाढ होतं असल्याचं चित्र आहे. यंदा लालबागच्या राजाचा ९१ वा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.   गणेशोत्सव काळात लालबागचा राजाच्या चरणी ५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपयाचे रोख रक्कम जमा झाली. तर, चार किलोपेक्षा जास्त सोनं आणि ६४ किलो पेक्षा अधिक चांदी जमा झाली आहे. त्यातील वस्तूंचा शनिवारी लिलाव होणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number