Lalbaugcha Raja : बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला सुरुवात! चरण दर्शनाची रांग बंद, मुख दर्शन किती वाजेपर्यंत?

मुंबई : गणेशोत्सावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असलेली भाविकांची गर्दी आणखीच वाढलेली आहे. मुंबईसह पुणे,नाशिक आणि इतर राज्यांतूनही भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. याच निमित्ताने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. अनंत चतुर्दशीला लालबागच्या राज्याचे भव्य विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक ही मुंबई शहरातील सर्वात मोठी आणि आकर्षक […]

Lalbaugcha Raja : बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला सुरुवात! चरण दर्शनाची रांग बंद, मुख दर्शन किती वाजेपर्यंत?
दर्शनाची रांग कधी बंद होणार?

मुंबई : गणेशोत्सावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असलेली भाविकांची गर्दी आणखीच वाढलेली आहे. मुंबईसह पुणे,नाशिक आणि इतर राज्यांतूनही भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. याच निमित्ताने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनंत चतुर्दशीला लालबागच्या राज्याचे भव्य विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणूक ही मुंबई शहरातील सर्वात मोठी आणि आकर्षक मिरवणूक असते. याच मिरवणुकीची तयारी करावी लागते. मंडपातील कामे, सुरक्षेती व्यवस्था तसेच मिरवणुकीचा मार्ग मोकळा करणे, यासाठी दर्शनाच्या रांगा बंद कराव्या लागतात. दरवर्षी असेच केले जात आहे.यंदाच्या वर्षीही मंडळाने दर्शन बंद करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

हेही वाचा-UPS Pension Rules 2026: आता ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी, मासिक पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट समोर

कधी बंद होणार रांगा?
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार,24 सप्टेंबर अर्थात आज पहाटे 6 वाजता चरणस्पर्शाची रांग बंद केली जाणार होती. म्हणजेच तुम्हाला बाप्पाच्या चरणाला स्पर्श करुन दर्शन घ्यायचे असेल, तर त्याआधी जावे लागेल. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री ठिक 12 वाजता मुखदर्शनाची रांग देखील बंद केली जाणार आहे. मुखदर्शन म्हणजे लांबून बाप्पाचे दर्शन घेणे. ही रांग बंद होताच सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेता येणार नाही. रांगा बंद झाल्यानंतर मंडळ विसर्जनाच्या धार्मिक विधींना सुरुवात करेल आणि बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरु केली जाईल. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरिता गुरुवार दि. २४-०९-२०२६ पहाटे ६.०० वाजता चरणस्पर्शाची रांग आणि गुरुवार
दि. २४-०९-२०२६ रात्री १२ वाजता मुखदर्शनाची रांग बंद करण्यात येईल.
#lalbaughcharaja For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the… pic.twitter.com/rtAZRbXzPH — Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 23, 2026

“>http://

तुम्ही अजूनही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले नसेल, तर घाई करा. आजच मध्यरात्रीच्या आधी दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. शेवटच्या क्षणी जाऊ नका, कारण प्रचंड गर्दी असेल आणि अचानक रांगा बंद होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे दर्शनाला जाताना पाणी,थोडा वेळ आणि प्रचंड गर्दीमध्ये सांभाळून जाण्याची तयारी ठेवा. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींनाही घेऊन जात असाल तर अधिक काळजी घ्या. अनंत चतुर्दशीला लालबागचा राजा आपल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचा निरोप घेईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number