जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 रद्द करण्यात आलं यावेळी काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आली होती. यामुळे जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अमित शाह यांनी काश्मीरमधून 370 हटवण्यासाठीचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतला यानंतर याचे तीव्र पडसाद काश्मीरमध्ये उमटणार हे नक्की होतं. त्यामुळे अद्यापही तेथील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद होती ती हळूहळू सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. आणि अमित शाह यांनी कलम 370 काश्मीरमधून हटवले या दरम्यान काश्मीरमध्ये संचारबंदी, जमावबंदी करण्यात आली होती. 5 ऑगस्टपासून गेले 12 दिवस राज्यातील जनजीवन बंदिस्त झाले होते. काश्मीरमधील जनजीवन सुरळीत चालू होतं.
प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांत हिंसाचाराची किंवा जीवितहानीची एकही मोठी घटना घडलेली नाही. त्यांमुळे काश्मीरमधील जनजीवन सुरळीत होत आहे. याच कारणास्तव काश्मीरमधील निर्बंध हटवण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये शनिवारपासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनीसह 2 जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.
या निर्णयानंतर दहशतवादी संघटनांनी काश्मीर मधील वातावरण बिघडलवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. याठिकाणी शुक्रवारचा नमाजही सुरळीत पाडली. त्यामुळे आता काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्याच्या 12 जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत असून केवळ पाच जिल्ह्य़ांत रात्री किमान निर्बंध असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.