काशिफ खानने मलिकांचे आरोप फेटाळले

 क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच क्रूझवरील ड्रग्जपार्टीचे आयोजन हे फॅशन टीव्हीचे प्रमुख काशिफ खान यांनी केले असल्याचे मलिकांनी सांगितले. तसेच काशिफ खान हा समीर वानखेडे यांचा मित्र असल्यामुळे त्याच्यावर कारवाई न केल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. मात्र कशिफ खान यांनी मलिकांचे आरोप […]

काशिफ खानने मलिकांचे आरोप फेटाळले

 क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच क्रूझवरील ड्रग्जपार्टीचे आयोजन हे फॅशन टीव्हीचे प्रमुख काशिफ खान यांनी केले असल्याचे मलिकांनी सांगितले. तसेच काशिफ खान हा समीर वानखेडे यांचा मित्र असल्यामुळे त्याच्यावर कारवाई न केल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. मात्र कशिफ खान यांनी मलिकांचे आरोप फेटाळले आहेत. ‘मी क्रुझवरील पार्टीचा आयोजक नसल्याचे’ काशिफ खानने सांगितले आहे.

 ‘नवाब मलिकांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून मी क्रूझवरील पार्टीचे आयोजन केले नाही. मी त्या क्रूझ पार्टीचा आयोजक नव्हतो,’ याबाबत काशिफ खानने खुलासा केला आहे. तसेच माझे समीर वानखेडेंसोबत कुठलेही संबंध नसल्याचे कशिफ खान यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number